सुचना-काही Tools Under Maintenance आहेत,लवकरच सर्व टुल पुर्न करुन उपलब्ध करुन दिल्या जातील, या ब्लॉगला भेट दिल्याबदल मन:पुर्वक धन्यवाद.....السلام عليكم ورحمة الله وبركاتہ ، کچھ ٹولس عمل پذیر ہیں،بہت جلد تمام ٹولس مکمل کرکے آپ کی خدمت میں پیش کئے جائے گے، انشااللہ، بلاگ پر حاضری دینے کے لیے ہم آپ کے شکرگذار ہے۔،جزاک اللہ ۔۔۔۔۔۔۔۔ Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 19 December 2022

शाळा व्यवस्थापन समिती || School Management Committee || SMC


शाळा व्यवस्थापन समिती रचना, कार्ये व जबाबदाऱ्या | SMC शासन निर्णय

📄SMC शासन निर्णय 

1)SMC रचनेच्या अटी व शर्ती, 2)SMC समितीची कार्ये, जबाबदाऱ्या व  महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील DOWNLOAD NOW बटनाला स्पर्श करून शासन निर्णय 17 जून 2010 Download करा..!!


📄शाळा व्यवस्थापन समिती ठराव व सभा इतिवृत्त पुस्तक नमूना

 SMC शाळा व्यवस्थापन समिती ठराव व सभा इतिवृत्त पुस्तक नमूना प्राप्त करण्यासाठी खालील DOWNLOAD NOW बटनाला स्पर्श करून  Download करा..!!



📌शाळा व्यवस्थापन समिती रचना : (अटी व शर्ती खालीलप्रमाणे)

1) सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
2) यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील, पालक यामधून असतील.
    अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
    ब) उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातीत बालकाच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
    क) पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्यात यावे.
3) उर्वरित 25 टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील -
    अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी - एक. (स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील)
    ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक - एक.
    क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ/ बालविकास तज्ञ - एक.
4) वरील अ.क्र.२ मधील बालकांचे आईवडील/ पालक सदस्यांमधून, सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील.
5) शाळेचे मुख्याध्यापक/ प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
6) या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील.


📌शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये :

(अधिनियमातील कलम-२२ नुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.)
  1. शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
  2. आर्थिक वर्ष संपण्याच्या किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट 'अ' प्रमाणे)
  3. ३) शाळेस शासनाकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
  4. बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
  5. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
  6. अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
  7. बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची दक्षता घेणे.
  8. शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनाचे संनियंत्रण करणे.
  9. शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
  10. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  11. शाळेतीत मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे. 
  12. शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
  13. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
  14. मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
  15. निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
  16. शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
  17. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे. 
  18. समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
टीप- सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील.


📌शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या :

  • - शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
  • - शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
  • - शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरूप करणे.
  • - शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
  • - गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
  • - शालेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
  • - शालेय मंत्रिमंडळ/ बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
  • - शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
  • - शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
  • - शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
  • - शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
  • - महिन्यातून किमान एक बैठक घेणे. बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
  • - आपले ध्येय (१००% पटनोंदणी १००% उपस्थिती.)


📌शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शक सूचना :

  1. शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी.
  2. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी. 
  3. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एमेकांनांचा आदर करावा.
  4. समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. 
  5. शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी. 
  6. शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावी.
  7. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
  8. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य/ मुख्याध्यापक/ शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
  9. विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करून शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.

📌शाळा व्यवस्थापन समिती गठन -

  1. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना.
  2. समितीचा कार्यकाल २ वर्षे, २ वर्षांनंतर पुनर्रचना.
  3. मुख्याध्यापक/ केंद्रप्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालक सभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक.
  4. समितीची रचना राजकीय/ सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील/ नियमावलीतील तरतुदींच्या आधारे करावी.
  5. समितीचे ७५% सदस्य बालकांचे माता पिता किंवा पालक उर्वरित २५% सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत/ म.न.पा./ न.पा. सदस्य, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकासतज्ज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश.
  6. किमान ५०% सदस्य, महिला.
  7. स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.)
  8. पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
  9. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता, पिता किंवा पालक यांना प्रतिनिधीत्व.


📌टप्पा क्र.1 पूर्वतयारी

  1. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन पूर्वतयारी करताना सद्यस्थितीत असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीस अवगत करावे.
  2. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान आठ दिवस अगोदर पालक सभेचे लेखी सूचना द्यावी. ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दिनांक, वेळ, स्थळ यांचा उल्लेख करावा. लेखी सूचना रजिस्टरवर पालकांच्या स्वाक्षर्‍या घ्याव्यात.
  3. त्याच दिवशी स्थानिक प्राधिकरण किंवा ग्रामपंचायतला पत्र देऊन एक सदस्याची मागणी करावी जेणेकरून पालक सभेपर्यंत त्यांचे नाव आपल्यापर्यंत येईल त्यामुळे समिती मधील महिला व पुरुषांचे प्रमाण राखणे शक्य होईल.
  4. RTE कलम २१ नुसार पुनर्गठन करतांना पुनर्गठन मधील बारकावे समजून घ्यावेत.
  5. सदर समितीमध्ये १२ ते १६ सदस्य संख्या राहील (मुख्याध्यापक पदसिद्ध सचिव-१ स्विकृत विद्यार्थी सदस्य-२ वगळून)
  6. एकूण समितीच्या ७५ % आई-वडील किंवा पालक सदस्य त्यांची निवड पालक सभेतून करावी.
  7. पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक वर्गातून सदस्य घ्यावेत.
  8. तसेच उपेक्षित गटातील, दुर्बल घटकातील व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या माता पित्यांना प्रमाणशीर सदस्यत्व देण्यात यावे. म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक विद्यार्थी संख्या असेल अशा वर्गातून वरील गटातील पालकांना जास्तीचे पालक सदस्यत्व देण्याचा प्रयत्न करावा.
  9. कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदा. १ली ते ८वी मध्ये १२ पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते.

म्हणजे :- एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या
                  समजा वर्ग निहाय एकूण पटसंख्या १७८ आहे.
                  १७८ ÷ १२ = १४.८३ म्हणजे १५ मुलामागे एक सदस्य


वर्ग | पटसंख्या | अपेक्षित सदस्य संख्या
वर्ग १ला    २९    
वर्ग २रा    ३०    
वर्ग 3रा    ३२    
वर्ग ४था    २८    
वर्ग ५वा    १८    
वर्ग ६वा    १५    
वर्ग ७वा    १४    
वर्ग ८वा    १२    
एकूण

पटसंख्या | १७८ | १२ सदस्य


  • ४. याच बरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देता येत नाही असाच नियम लावला पाहिजे कि, ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या जास्त आहे तेथे पुरुषांना सदस्य देणे. तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य द्यावेत.
  • ५. जातिनिहाय :- १)OPEN- ८०/१५ = ५ प्रतिनिधी, २)SC- २६/१५ =२, ३)OBC- ५२/१५ = ४ ,४) ST -१८/१५ =१ अश्या प्रमाणात निवड करावी. परंतु शाळेमध्ये अल्प प्रमाणात काही संवर्गातील विद्यार्थी असतील तर त्यांनाही प्रतिनिधित्व प्रमाणात देणे अपेक्षित आहे.

  • ७. २५ % इतर सदस्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक शिक्षण तज्ञ यांचा समावेश होतो.
  • १. वेगवेगळ्या वर्गातून १ मुलगा १ मुलगी असे २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य घ्यावेत विद्यार्थी सदस्य स्वीकृत सदस्य असल्यामुळे एकूण समितीमध्ये त्यांचा समावेश होत नाही. जर एकूण समिती १६ सदस्यांची असेल तर २ विद्यार्थी प्रतिनिधी मिळून १८ सदस्य संख्या व १ मुख्याध्यापक सचिव असे एकूण १९ सदस्यांची समिती होईल.
  • २. सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधीची निवड करावी.
  • ३. ग्रामपंचायत कार्यालयाला अधिकृत पत्र देऊन एक सदस्याची मागणी करावी.
  • ४. पालक सभेमधूनच स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्यांची निवड करावी.

  • ८. एकूण समितीच्या ५०% महिला सदस्य घेणे अनिवार्य आहे.
  • १. फक्त पालक सद्स्यातून ५० % महिला घेतल्यास प्रमाण चुकते व RTE नुसार महिला प्रमाण होत नाही. त्याकरिता स्थानिक प्राधिकरण अथवा ग्रामपंचायत कडून महिला किंवा पुरुष सदस्य मिळाल्यास, पालकांमधून महिलांचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेता येईल. उदा. जर ग्रामपंचायत सदस्य महिला असेल तर ५० % महिला प्रमाण राखताना अडचण येणार नाही. अन्यथा पुरुष सदस्य दिले तर पालक सद्स्यातून महिलांचे प्रमाण वाढवावे लागेल. त्याकरिता किमान आपल्या पालक सभेपर्यंत ग्रामपंचायत प्रतिनिधी मिळेल या बेताने पूर्वीच ग्रामपंचायतला पत्र लिहून सदस्यांची मागणी करावी.

📌टप्पा क्र.2 प्रत्यक्ष कार्यवाही

  1. वर्ग निहाय प्रतिनिधित्व संख्या व जात निहाय सदस्य संख्या यांची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी.
  2. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान -
  3. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्ग निहाय बसतील यासाठी व्यवस्था करावी.
  4. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य, जबाबदारीची माहिती द्यावी.
  5. वर्ग निहाय किती सदस्य निवडणार आहोत हे फलकावर मांडून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर अनुक्रमे लिहावीत.
  6. वर्ग निहाय सदस्य निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असेल तर गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे. अन्यथा खुले मते देखील स्वीकारू शकतो.
  7. गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व त्यावरती सदस्यांचे नाव किंवा अनुक्रमांक लिहून घ्यावा.
  8. एका वर्गातून एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार असेल तर एक एक सदस्यांची निवड प्रक्रिया राबवावी.
  9. जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित करावे.
  10. पूर्वतयारी मधील माहितीच्या आधारे सदस्यांची निवड करून घ्यावी.
  11. सर्व वर्गातील पालक सदस्यांची निवड झाल्यावर पालक सभेमधून एका स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्यांची निवड करून घ्यावी. हा सदस्य पालक असणे अनिवार्य नाही.
  12. स्थानिक शिक्षण तज्ञ सदस्य निवडल्यानंतर फक्त ७५% पालकांमधून नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घ्यावी. व त्यांच्या मधूनच समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यास सांगावे या प्रक्रियेदरम्यान इतर पालकांचा हस्तक्षेप होत असेल तर एखाद्या वेगळ्या वर्गखोलीत व्यवस्था करून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करून घ्यावी अथवा पुन्हा एक ते दोन दिवसांचा अवधी देऊन दिनांक वेळ स्थळ ठरवून पालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करून घ्यावी.
  13. त्यानंतर शिक्षकांमधून निवडलेल्या एका प्रतिनिधीचे नाव समितीमध्ये घ्यावे.
  14. त्याचप्रमाणे बाल सभेमधून दोन निवडलेल्या स्विकृत विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये करावा.

📌टप्पा क्र.3 समिती पुनर्गठनानंतर

  1. पालक सभेचे इतिवृत्त वर सर्व उपस्थित पालकांचे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केल्याबद्दल इतिवृत्त लिहून स्वाक्षऱ्या घ्याव्यात व निवडलेल्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांची नावे वाचून दाखवीत.
  2. इतरही महत्त्वाच्या सूचनांचे व नियमांचे वाचन करून नवनिर्वाचित समितीला व पालकांना अवगत करावे.
  3. सरतेशेवटी नियोजीत पालक सभा नवनिर्वाचित समिती चे स्वागत व आभार मानून बंद करावी.




No comments:

Post a Comment

Back to Top